अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांच्या हत्येनंतर संशयित हल्लेखोर पळून जात असलेला एक व्हिडीओ FBI नं जारी केला आहे. त्याच्याकडे बंदूक आणि इतर शस्र दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मोठी शोध मोहिम हाती घेतली असली तरी कुणालाही अटक केलेली नाही.
दरम्यान अमेरिकेत टेक्सास राज्यातल्या डल्लासमध्ये कामाच्या ठिकाणी एका भारतीय वंशाच्या नागरिकाची हत्या झाली. याप्रकरणी हल्लेखोराला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती भारतीय दुतावासानं दिली.