April 27, 2025 6:55 PM | CharDhamYatra

printer

चारधाम यात्रेसाठी नोंदणी केलेल्या ७७ पाकिस्तानी नागरिकांची नोंदणी रद्द

चारधाम यात्रा आणि हेमकुंड साहीब यात्रेसाठी नोंदणी केलेल्या ७७ पाकिस्तानी नागरिकांची नोंदणी उत्तराखंड राज्य सरकारने रद्द केली आहे. राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सतपाल महाराज यांनी आज ही घोषणा केली. दहशतवाद आणि पर्यटन हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार सर्व भाविकांना सुरक्षिततेचा अनुभव देण्यासाठी कटीबद्ध असल्याचंही ते म्हणाले. चारधाम यात्रेसाठी २२ लाख भाविकांन नोंदणी केली असून यात इतर देशातल्या २५ हजार भाविकांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.