डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 4, 2024 8:15 PM

printer

तीन राज्यातल्या पोटनिवडणुकांसाठी मतदानाच्या तारखेत बदल

केरळ, पंजाब आणि उत्तरप्रदेशातल्या १४ विधानसभा मतदारसंघामधल्या पोटनिवडणुकांसाठी मतदानाची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने बदलली आहे. पलक्कड, डेरा बाबा नानक, चब्बेवाल,गिद्देरबाहा, बर्नाला, मीरपूर, कुंदर्की, गाझियाबाद, खैर,कऱ्हाल, सिशामाऊ, फुलपूर, कटेहारी आणि मझवा या मतदारसंघांमधे १३ नोव्हेंबरला मतदान होणार होतं, ते आता २० नोव्हेंबरला होणार आहे.  १३ नोव्हेंबरच्या आसपास अनेक धार्मिक उत्सव असल्यानं मतदानाची तारीख बदलण्याची विनंती अनेक राजकीय पक्ष तसंच सामाजिक संस्था संघटनांनी केला होती. मतमोजणी २३ नोव्हेंबरला होईल.