June 15, 2024 12:43 PM

printer

चंद्रयान -१ मोहिमेचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचं निधन

चंद्रयान -१ या पहिल्या चांद्रमोहिमेचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचं काल बंगळरू इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते.   हेडगे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. 

तीन दशकांहून अधिक काळ हेगडे भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोमध्ये कार्यरत होते. इस्रोच्या अनेक महत्त्वाच्या अंतराळ मोहिमेत ते सहभागी झाले होते. २००८ मध्ये भारताच्या पहिल्यावहिल्या चंद्रयान १ या इस्त्रोच्या महत्त्वाच्या मोहिमेत हेडगे यांची भूमिका महत्त्वाची होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.