ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपाला काहीही फरक पडत नसल्याचा दावा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांन आज केला. अकोल्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांनीही चर्चेची तयारी दाखवली तर भाजप त्यासाठी तयार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक लढवली तरी भाजपाला त्याचा काहीही फरक पडत नाही, असं ते म्हणाले. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये मोठं यश भाजपा आणि महायुतीला मिळेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
Site Admin | December 20, 2025 6:45 PM | Chandrasekhar Bawankule
ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपाला फरक पडत नसल्याचा बावनकुळे यांचा दावा