राज्यात अनेक मतदारसंघात मतदारांची दुबार नावं आहेत, असं सांगत राज्यातल्या मतदार यादीत अनियमितता असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. कामठीत सुमारे ८ हजार, सिल्लोडमध्ये ८९०, आणि मालेगावात सुमारे १३० मतदारांची नावं दुबार आहेत. या संदर्भात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदार यादीत नावं समाविष्ट होतात, पण गाळली जात नाहीत, हा मुख्य प्रश्न आहे, असं बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती असंही बावनकुळे त्यांनी सांगितलं. दुसरीकडे याच मतदार यादीच्या आधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले, मात्र आता ते भाजपावर टीका करत आहेत, विरोधकांची मानसिकता अशीच राहिली तर पुढली २५ वर्षं महाविकास आघाडी सत्तेवर येणार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
Site Admin | November 3, 2025 7:21 PM | Chandrasekhar Bawankule
राज्यात अनेक मतदारसंघात मतदारांची दुबार नावं-चंद्रशेखर बावनकुळे