वाळू माफियांवर मकोका लावण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत

वाळू माफियांना रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यांच्यावर मकोका लावणे, हद्दपार करणे अश्या कडक कारवाया करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज अकोल्यात भाजपच्या विभागीय मेळाव्यादरम्यान बोलत होते. कडक कायदे असणारं नवं वाळू धोरण लवकरचं जाहीर करण्यात येणार असल्याचही ते म्हणाले. ज्या नेत्यांना जनतेत जाऊन काम करता येत नाहीत ते ईव्हीएम मशीनवर ठपके ठेवत असल्याचा आरोप विरोधकांवर करताना महायुतीत कुठलीही नाराजी नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.