१० जानेवारीला होणाऱ्या घर चलो अभियानामुळे सदस्यता नोंदणीला चालना मिळेल- बावनकुळे

भारतीय जनता पक्षाने दीड कोटी प्राथमिक सदस्य आणि ५ लाख सक्रीय सदस्यांचं लक्ष्य ठेवल्याची माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मुंबईत आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. १० जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या घर चलो अभियानामुळे सदस्यता नोंदणीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १२ जानेवारी रोजी अहिल्यानगर इथं होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीसाठी जवळपास १५ हजार कार्यकर्ते येणार असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री अमित शहा, तर समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचंही बावनकुळे यांनी नमूद केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.