आकांक्षित जिल्हे आणि तालुके या कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात राबवण्यात आलेल्या संपूर्णता अभियानामधील कामगिरीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्णपदक मिळालं आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात झाला.
या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यातले आरोग्य विभागातले कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कार्याची दखलही घेण्यात आली.