नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असून, यात संशोधनावरही भर देण्यात आला आहे आणि हे धोरण आधुनिक काळातल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारं आहे असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितलं. मुंबईत उर्मीज आर्ट फोरमतर्फे आयोजित ‘नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर’ प्रदर्शनाचं उदघाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्त्वाची असते, असं ते म्हणाले.
Site Admin | November 15, 2025 7:20 PM | Chandrakant Patil
नवे शैक्षणिक धोरण आधुनिक काळातल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारं आहे – मंत्री चंद्रकांत पाटील