मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. सध्या ते मुंबई उच्च न्यायालयातच न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.
सध्याचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायची शिफारसही न्यायवृंदाने काल केली. तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या सहा अतिरिक्त न्यायाधीशांना कायमस्वरूपी नियुक्त्या देण्याची शिफारसही न्यायवृंदाच्या कालच्या बैठकीत करण्यात आली.