देशाची सैन्यदलं अतिशय देशभक्तीने तसंच कार्यक्षमतेने देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्यदलांची प्रशंसा केली आहे. नवी दिल्लीत आयोजित चाणक्य संरक्षण संवाद २०२५ मध्ये त्या आज बोलत होत्या. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये देशाच्या दहशतवादविरोधी आणि प्रतिबंधात्मक क्षमतेचा परिचय मिळाला असून भारतीय सैन्यदलांनी ज्या कार्यक्षमतेने आणि नैतिक जाणीव ठेवून लष्करी क्षमता वापरली त्याची जगभरात नोंद घेतली गेली आहे, असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रपती आजपासून ओदिशाच्या दौऱ्यावर असून आज संध्याकाळी त्या ओदिशा विधानसभेच्या हिवाळी सत्राला संबोधित करतील. राष्ट्रपती पदभार स्वीकारल्यापासून प्रथमच ओदिशाच्या विधानसभेला संबोधित करणार आहेत.