डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

Champions Trophy : भारतीय संघाला ५८ कोटी रुपयांचं रोख पारितोषिक

आयसीसी विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला क्रिकेट नियामक मंडळानं ५८ कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलं आहे. मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सांगितलं की आयसीसीचं विजेतेपद लागोपाठ मिळवणं ही विशेष कौतुकाची बाब आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुबईमधे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करुन विश्वकरंडकावर नाव कोरलं होतं.