राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारा ‘चलो जीते है’ हा चित्रपट उद्यापासून २ ऑक्टोबरपर्यंत देशभरात पुनर्प्रदर्शित होणार असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज दिली. स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वांनी प्रेरित झालेल्या नरू या लहान मुलाची कहाणी हा चित्रपट सांगतो. देशभरातली जवळपास ५०० चित्रपटगृहं आणि शाळांमध्ये हा चित्रपट दाखवला जाणार असून त्यानंतर समाजासाठी काम करणारे सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी, चालक, मदतनीस अशा कर्मचाऱ्यांचा सत्कारही होणार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.
Site Admin | September 16, 2025 8:44 PM | Chalo Jeete Hain | Rerelease
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारा ‘चलो जीते है’ चित्रपट पुनर्प्रदर्शित