गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर उणे १३ शतांश टक्क्यांपर्यंत घसरला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थ, खनिज तेल, मूलभूत धातूंचे उत्पादन, कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत घट झाल्यामुळे ही घसरण झाली आहे.
या वर्षी मार्चपासून चलनफुगवट्याचा दर कमी होत असून मे महिन्यात तो उणे ३९ शतांश टक्क्यांवर पोहोचला होता. खाद्यपदार्थांच्या बाबतीत हा दर उणे २६ शतांश टक्क्यांपर्यंत घसरला आहे. इंधन आणि वीज क्षेत्रात उणे २ पूर्णांक ६५ शतांश टक्क्यांची घसरण झाली आहे.