कच्च्या स्वरुपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र जारी करणाऱ्या किंबर्ले प्रोसेस संस्थेचं उपाध्यक्ष पद भारताकडे

कच्च्या स्वरुपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या किंबर्ले प्रोसेस या संस्थेचं उपाध्यक्ष पद आजपासून भारत स्वीकारत आहे. अवैध कारवायांना पाठबळ देण्यासाठी होणारा हिऱ्यांचा व्यापार रोखण्यासाठी किंबर्ले प्रोसेस ही संस्था २००३ मधे स्थापन झाली, यात जगभरातली सरकारं, हिरे उद्योग तसंच सामाजिक संघटनांचा समावेश आहे. जानेवारीपासून भारत या संस्थेचं अध्यक्षपद भूषवणार आहे. पारदर्शक व्यापाराविषयी भारताच्या वचनबद्धतेवर जगाचा विश्वास असल्याचं यामुळे सिद्ध होतं, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल याविषयी बोलताना म्हणाले. किंबर्ले प्रोसेस या यंत्रणेत सध्या ६० पेक्षा जास्त देश सहभागी आहेत. त्यामुळे हिरे व्यापाराचं नियमन करणारी ही सर्वात मोठी संस्था बनली आहे.