October 28, 2025 9:14 AM

printer

डाळी आणि तेलबियांच्या, १५ हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या खरेदी योजनेला केंद्राची मंजुरी

केंद्र सरकारने २०२५-२६च्या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र, तेलंगण, ओडिशा आणि मध्य प्रदेश या चार राज्यांतील डाळी आणि तेलबियांच्या, १५ हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या खरेदी योजनेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील सोयाबीनची १८ लाख ५० हजार ७०० मेट्रिक टन, उडदाची ३ लाख २५ हजार ६८० मेट्रिक टन आणि मूगाची ३३ हजार मेट्रिक टन खरेदी केली जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल ही घोषणा केली. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान; म्हणजेच पीएम-आशा अंतर्गत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या संदर्भात चौहान यांनी काल राज्यांच्या कृषिमंत्र्यांबरोबर दूरस्थ माध्यमातून बैठक घेतली. देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित ठेवण्याला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.