मध्य रेल्वेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त 3 एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे. पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा गाड्या 1 ते 10 जुलैपर्यंत चालवल्या जाणार आहेत. सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी 83 आषाढी विशेष गाड्याही चालवल्या जात आहेत. 29 जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह तिकीटविक्री सुरू होईल. तपशीलवार माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.