डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा

UPSC अर्थात केंद्रिय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांचा कार्यकाळ २०२९ मध्ये संपणार होता, पण आपल्या वैयक्तिक कारणांसाठी त्यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. सोनी २०१७ पासून केंद्रिय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहत होते. १६ मे २०२३ रोजी त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. केंद्रिय लोकसेवा आयोगाचे सदस्य होण्याआधी सोनी यांनी दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून काम केलं होतं.