डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आंध्रप्रदेशातल्या पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथक आज पाहणी करणार

आंध्रप्रदेशातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय गृहविभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कुमार जिंदाल यांच्या नेतृत्वाखालचं पथक जात आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यापूर्वी या पथकानं ताडपल्ली इथं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.  देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्रविभागाने व्यक्त केली आहे, छत्तीसगड मधे पुढचे सहा दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून सौराष्ट्र आणि कच्छमधे उद्यापर्यंत जोरदार पाऊस राहील. गोवा कोकण आणि गुजरातमधे येत्या रविवारपर्यंत पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे. उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि राजस्थानातही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.