आगामी दोन वर्षात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची माहिती महासंचालक राजविदंर सिंग भट्टी यांनी दिली. ते चेन्नईत बोलत होते.
माऊंट एव्हरेस्ट चढाई करण्यासाठी दलाच्या महिलांचं प्रशिक्षण सुरू आहे. तसंच सुरक्षेसंदर्भातील आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.