डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विकसित भारत अभियानात युवकांना सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारचा ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम

विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारनं ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शुभारंभ 12 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभर एकाच दिवशी होणार असून, या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल दिली. मांडवीय यांनी सर्व राज्यांच्या क्रीडा मंत्री आणि सचिवांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. देशातील युवकांचा विकसित भारत अभियानात जास्तीत जास्त सहभाग वाढवावा, विविध उपक्रमांद्वारे त्यांची सामाजिक जाणीव वाढावी, तसंच क्रीडा क्षेत्रात त्यांची रुची वाढावी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रमा अंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात यावं, अशा सूचना मांडवीय यांनी दिल्या.