डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हे बदल ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू असतील. मोठे व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी गव्हाच्या साठ्याची मर्यादा आता दोन हजार टनांवरून एक हजार टनांपर्यंत कमी करण्यात आली आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रति विक्री कक्षासाठीची मर्यादा दहा टनांवरून पाच टनांपर्यंत आणण्यात आली आहे. अन्नसुरक्षेचं नियोजन करण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधले व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि इतरांसाठी गव्हाच्या साठ्यावर मर्यादा घातली होती. आता त्यात बदल करण्यात आले आहेत. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. देशात गहू मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्याचंही त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.