डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 1, 2024 8:32 PM

printer

पूरग्रस्त १४ राज्यांना केंद्र सरकारकडून निधी जारी, महाराष्ट्राला सर्वाधिक १,४९२ कोटी रुपये मिळणार

पूरग्रस्त १४ राज्यांना ५ हजार ८५८ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं आज जारी केला. त्यापैकी सर्वाधिक हिस्सा म्हणून महाराष्ट्राला १ हजार ४९२ कोटी रुपये मिळणार आहे. राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधीतला केंद्र सरकारचा वाटा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद निधीतला आगाऊ हप्ता म्हणून हा निधी दिला जातोय. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळं या राज्यांमध्ये नुकसान झालं होतं. यावर्षी आतापर्यंत २१ राज्यांना एकूण १४ हजार ९५८ कोटी रुपयांचा निधी वितरीत झाला आहे.