‘मराठा, ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा’

मराठा आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती इथं केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या समाजांच्या आंदोलनांमुळं सामाजिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं काळजी घ्यावी, असं पवार यांनी यावेळी सुचवलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.