डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्र सरकारकडून देशभरात कृषी संकल्प अभियानाला सुरूवात

विकसित भारत घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात सुधारणा आणि विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात कृषी संकल्प अभियान सुरू केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात अडगाव या संपूर्ण आदिवासी गावात आज या अभियाना अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. कृषी विभाग, पशु संवर्धन विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे शेतकऱ्यांना जैविक शेती, फळ, भाजीपाला शेती, कृषिपूरक उद्योगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कृषि संकल्प अभियान नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवण्यात येत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष होतांना दिसत आहे. ऐकूया शेतकरी विलास ठाकरे यांची प्रतिक्रीया….