तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लादणारं विधेयक लोकसभेत मंजूर

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरीक्त उत्पादन शुल्क लादायला मंजुरी देणारं विधेयक लोकसभेनं आज आवाजी मतदानानं मंजूर केलं. जीएसटीतला अधिभार रद्द झाल्यावर हे शुल्क लागू होणार आहे. तंबाखू, सिगारेट, सिगार, हुक्का, जर्दा, सुगंधी तंबाखू यासारख्या गोष्टींवर हे अतिरीक्त उत्पादन शुल्क लागू होईल. सध्या यावस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागू होतो. या विधेयकात यामुळं सिगारेट पावणे ३ ते ११ रुपयांचं आणि तंबाखू किलोमागे शंभर रुपयांचं उत्पादन शुल्क लागण्याची शक्यता आहे. जीएसटी अधिभार कमी झाल्यानं कमी होऊ शकणाऱ्या किंमती या अधिभारामुळं कायम राहतील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. नागरिकांनी या वस्तूंचा उपयोग कमी करावा यासाठी हे शुल्क लादलं जात असल्याचं त्या या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाल्या.

 

पान मसाल्याच्या प्रत्येक लहान मोठ्या पाकिटावर किरकोळ विक्री किंमत लिहिणं आणि आवश्यक सूचना देणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. १ फेब्रुवारीपासून हे नियम लागू होतील. यापूर्वी १० ग्रॅम पेक्षा कमी आकाराच्या पाकिटावर किंमत लिहिणं बंधनकारक नव्हतं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.