January 10, 2026 6:55 PM

printer

कायद्याचं उल्लंघन करत सेवा शुल्क आकारल्याबद्दल देशातल्या २७ उपाहारगृहांविरोधात कारवाई

कायद्याचं उल्लंघन करून सेवा शुल्क आकारल्याबद्दल देशातल्या २७  उपाहारगृहांविरोधात सीसीपीए, अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं कारवाई केली आहे. या उपाहारगृहांना ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला असून, ग्राहकांना सेवा शुल्काची रक्कम परत करण्याचे आणि आपल्या बिलिंग प्रणालीमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

 

ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत, सेवा शुल्काची अनिवार्य आकारणी, ही अनुचित व्यापार पद्धत म्हणून घोषित करण्यात आली असून, सरकारी हेल्पलाईन नंबरवर ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवरून सीसीपीए नं ही कारवाई केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.