डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपुरात भाजपाच्या मध्य नागपूर कार्यकारीणीच्या बैठकीत बोलत होते. कार्यकर्ता जाती-धर्म-पंथानं मोठा होत नाही, तो कार्य आणि कर्तृत्वानं मोठा होतो. त्यामुळे जातीवादाचे समर्थन न करता आचरण चांगले ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कार्यकर्त्याच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक सुख-दुःखाशी नेत्यांनी समरस व्हावं. आपला नेता आपल्यासोबत उभा राहील असा विश्वास कार्यकर्त्याला मिळाला तर कार्यकर्ता कुठल्याही अपेक्षेविना काम करतो, असं गडकरी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.