डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ३ हजार ३०० कोटींच्या ४० योजनांना केंद्राची मंजुरी

केंद्र सरकारने देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना जागतिक मानकांनुसार विकसित करण्यासाठी सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी राज्यांना विशेष मदत दिली जाईल, ज्यावर, पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही.

 

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंग्रहालय, कृत्रिम प्रवाळ निर्मिती प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपये, तर नाशिक इथं रामकाल मार्गासाठी ९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असून, सरकार देशात पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत राहील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.