केंद्र सरकारनं जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या वर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घरांची गणना करण्यात येईल.
त्या आधीचे १५ दिवस नागरिकांना स्वतःहून या घरांच्या गणनेची माहिती देता येईल. दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी २०२७ मध्ये लोकसंख्येची गणना होईल. मोबाइल अॅपद्वारे केली जाणारी ही देशातील पहिली जनगणना असेल.