डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा भाजपचा आरोप

जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं की, सरकारनं जनगणना करण्याची घोषणा केली असून सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणना होईल, असं स्पष्ट केलं आहे.

 

केंद्र सरकारनं काल जनगणनेची अधिसूचना जारी केली, त्यात जातनिहाय जनगणना होईल, असा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला आहे. त्यावर त्रिवेदी उत्तर देत होते. जातनिहाय जनगणनेचं काम तेलंगण सरकारनं उत्कृष्टरीत्या केल्याचं पायलट यांनी म्हटलं आहे, त्यावर ते केवळ सर्वेक्षण होतं. जनगणना केंद्र सरकारच्या कार्यकक्षेत येते, असं त्रिवेदी म्हणाले.