July 22, 2025 7:08 PM | Census 2027

printer

२०२७ मधे सुरु होणाऱ्या जनगणनेच्या दृष्टीनं प्रशासनाची तयारी सुरु

२०२७मधे सुरु होणाऱ्या जनगणनेच्या दृष्टीनं प्रशासनाची  तयारी सुरु झाली असल्याची माहिती केंद्रसरकारने आज लोकसभेत दिली. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी एका लेखी उत्तरात सांगितलं की गेल्या ३ आणि ४ जुलै रोजी नवी दिल्ली इथं संबंधित अधिकाऱ्यांची परिषद झाली. त्यात जनगणनेच्या प्रक्रीयेबाबत चर्चा झाली. त्यात प्रशासकीय आस्थापना निश्चित करणं, मोबाईल पद्वारे माहिती गोळा करणं, आणि इतर कार्यपद्धतीचा समावेश होता.