डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 16, 2025 1:39 PM | Census 2027

printer

२०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेची अधिसूचना जारी

२०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेची आणि पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या जातनिहाय जनगणनेची अधिकृत अधिसूचना आज राजपत्रात प्रसिद्ध झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत यासंदर्भातल्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

 

देशभरात ३४ लाख प्रगणक आणि निरीक्षक, एक लाख तीन हजारांहून जास्त अधिकारी आधुनिक मोबाईल डिजिटल प्रणालीद्वारे या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी, मालमत्ता आणि सुविधा या माहितीचं संकलन, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक आणि जात विषयक माहिती संकलित करण्यात येणार आहे.

 

या प्रक्रियेमध्ये डिजिटल प आणि स्व-गणनेची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. देशातल्या बर्फाळ प्रदेशात एक ऑक्टोबर २०२६ पासून, तर इतर भागात एक मार्च २०२७ पासून जनगणना सुरू होणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा