आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त कार्यालयानं आज समाज माध्यमांवर जाहीर केलं. सुरुवातीला घरांची नोंदणी आणि मोजणी होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होईल, त्यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल असं त्यांनी कळवलं आहे. यासाठी १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२७ दरम्यान प्रशासकीय सीमारेषांमध्ये कुठलेही बदल करू नये असं आवाहन जनगणना आयुक्तांनी सर्व राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना केलं आहे.
Site Admin | July 7, 2025 3:29 PM | Census
आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार
