डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पाकिस्तानी झेंडे आणि संबंधित वस्तूंच्या विक्रीबद्दल ऑनलाईन पुरवठा कंपन्यांना नोटीस

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने पाकिस्तानी झेंडे आणि संबंधित वस्तूंच्या विक्रीबद्दल Amazon India, Flipkart, Ubuy India, एटसी, द फ्लॅग कंपनी आणि फ्लॅग कॉर्पोरेशन यांना नोटीस बजावली आहेत. अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. अशी असंवेदनशीलता खपवून घेतली जाणार नाही. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना अशी सर्व सामग्री त्वरित काढून टाकण्याचे आणि राष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पुण्यातल्या सुका मेवा व्यापाऱ्यांनीही तुर्कीएमधून येणाऱ्या सुक्या मेव्यावर बहिष्कार टाकला आहे. पुणे मार्केट यार्ड परिसरातल्या व्यापारी संघटनेनं आधी देश नंतर व्यापार, अशी भूमिका घेतली आहे.

 

भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणाऱ्या तुर्कीएसोबतचा सामंजस्य करार जवाहरलाल नेहरु विद्यापीठ-जेएनयूनं रद्द केला आहे. तुर्कीएच्या इनोनू विद्यापीठासोबत केलेला करार भारताच्या सुरक्षेचा विचार करुन रद्द करत असल्याचं जेएनयूनं म्हटलं आहे. अनेक पर्यटन कंपन्यांनीही तुर्कीए आणि अझर बैजानमधली नोंदणी रद्द केली, त्यामुळं तुर्कीएला जाणाऱ्या सुमारे १५ हजार प्रवाशांचीही नोंदणी रद्द झाली आहे.