केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता १२ वीचा निकाल आज जाहीर केला. यावर्षी ८८ पूर्णांक ३९ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत किरकोळ वाढ झाली आहे. यावर्षीही मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे. यंदा सीबीएसईच्या १२ वी च्या परीक्षेला एकूण १६ लाख ९२ हजार ७९४ विद्यार्थी बसले होते.
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल cbse.gov.in, results.nic.in, results.digilocker.gov.in या संकेतस्थळांवर बघता येईल.