January 6, 2026 1:20 PM | CBSE

printer

सीबीएसईचा समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय

विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणाव हाताळण्यास मदत व्हावी यासाठी सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी या सेवेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते १ जूनपर्यंत राबवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणाव, वेळेचं व्यवस्थापन तसंच इतर भावनिक तणावांना सामोरं जाता यावं यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं हा या उपक्रमाचा हेतू आहे. १ ८ ० ० १ १ ८ ० ० ४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून विद्यार्थी मदत मिळवू शकतात. याद्वारे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, तसंच मानसशास्त्रज्ञांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यातले ६१ समुपदेशक हे भारतातले तर बारा जण नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, जपान आणि कतारमधले आहेत.