डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सीबीएसईच्या इयत्ता १०वी आणि १२वी पुरवणी परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर

सीबीएसई अर्थात  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षेचं अंतिम वेळापत्रक आज जाहीर झालं. ही परीक्षा १५ ते २२ जुलै या कालावधीत होईल. सीबीएसईच्या संकेतस्थळावर  हे वेळापत्रक उपलब्ध आहे. 

परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत होईल, परंतु भारतीय संगीत, चित्रकला, व्यावसायिक कला, कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी-नृत्य, योग, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांची परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत होणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नोंद झालेले विद्यार्थी पुरवणी परीक्षाला बसू शकतील. नियमित परीक्षा दिलेल्या कंपार्टमेंट श्रेणीतल्या विद्यार्थ्यांना शाळेशी संपर्क साधावा लागणार आहे.