बीड जिल्ह्यात वाढती गुंडगिरी आणि अपहरणाच्या घटनांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी – बजरंग सोनवणे

बीड जिल्ह्यात वाढती गुंडगिरी आणि अपहरणाच्या घटनांची केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोनवणे यांनी भेट घेऊन ही मागणी केली. याविषयावर तातडीने ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्याचं खासदार सोनवणे यांनी सांगितलं.