डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सायबर गुन्हेगारीसंदर्भात सीबीआय चे देशभरात छापे, २६ जणांना अटक

जगभरातल्या लोकांची सायबर गुन्हेगारीद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीत सामील असलेल्या २६ जणांना काल केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय नं अटक केली. देशभरातल्या विविध ३२ ठिकाणी छापे घालून सीबीआय नं सायबर गुन्हेगारीचं हे जाळं उद्धस्त केलं. या प्रकरणी पुण्यातून १० जणांना अटक करण्यात आली असून पाच जणांना हैदराबादमधून तर ११ जणांना विशाखापट्टणम इथून ताब्यात घेतलं. या छाप्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मोबाइल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम यासह अन्य साहित्य सीबीआय नं जप्त केलं. या गुन्हेगारांनी परदेशातल्या, प्रामुख्यानं अमेरिकेतल्या नागरिकांची तांत्रिक सहाय्य सेवा पुरवठादार बनून फसवणूक केली. सीबीआयचा आंतरराष्ट्रीय तपास विभाग इंटरपोल तसंच परदेशी तपास संस्थांच्या मदतीनं ऑपरेशन चक्र ३ अंतर्गत संघटित सायबर गुन्हेगारीविरोधात कारवाई करत आहे अशी माहिती सीबीआय नं दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.