काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध सीबीआयची कारवाई

केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयनं भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध नवीन प्राथमिक तपासणी अहवाल दाखल केला आहे. हे प्रकरण कार्ती चिदंबरम आणि त्यांच्या एका जवळच्या सहाय्यकाच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका कंपनीवर मद्यविक्रीसाठी घातलेली बंदी उठवण्याच्या कथित अनियमिततेशी संबंधित आहे.