CBI चे संचालक प्रवीण सूद यांच्या कार्यकाळात वाढ

केंद्र सरकारनं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढवला आहे. मंत्रिमंडळाच्या समितीनं या मुदतवाढीस मंजुरी दिली. सूद हे कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी असून ते या महिन्याच्या २५ तारखेला निवृत्त होणार होते.