कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआय ७ जणांची पॉलीग्राफ चाचणी करणार

कोलकात्यात राधागोविंद कार रुग्णालयातल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी विशेष तपास पथकानं तपासाची कागदपत्र केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे सुपूर्द केली असून सीबीआय ७ जणांची पॉलीग्राफ चाचणी करणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचा त्यात समावेश आहे. सिएलदा न्यायालयानं दिली आहे. आतापर्यंत याप्रकरणी अटक झालेला एकमेव संशयित आरोपी संजय राय, तसंच घटनेच्या आधी  पीडितेबरोबर असलेले ४ डॉक्टर यांच्याही पॉलिग्राफ चाचण्या होणार आहेत. दरम्यान संजय राय ला काल १४ दिवसांची कोठडी काल देण्यात आली.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.