डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी सीबीआयला मंजुरी

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी आवश्यक मंजुरी सीबीआयला आज मिळाली. केजरीवाल यांच्याविरुद्ध सीबीआयनं एक आरोपपत्रही दाखल केलं आहे. त्याची सुनावणी येत्या २७ तारखेला दिल्लीच्या रोऊज अॅवेन्यू न्यायालयात होणार आहे. 

दरम्यान आपल्या अटकेला आव्हान देणाऱ्या, तसंच सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं तहकूब केली आहे. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी न्यायालयानं सीबीआयला आणखी एक आठवड्याचा अवधी दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.