डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 11, 2025 3:19 PM | CBI

printer

सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करून सीबीआय २ कोटी ८० लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी केली जप्त

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करून २ कोटी ८० लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीच्या चक्र-५ या मोहिमेअंतर्गत झालेल्या या कारवाईत तीन ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले. ओळख लपवून आंतरराष्ट्रीय फोन करण्यासाठीची यंत्रणा, तसंच सायबर गुन्हेगारीसाठी वापरलं जाणारं इतर साहित्य सीबीआयनं जप्त केलं.

 

तसंच एकाला अटकही करण्यात आली. त्याच्याकडे २२ लाखाची रोख रक्कम सापडल्याची माहितीही सीबीआयनं पत्रकाद्वारे दिली आहे. ही टोळी सरकारी अधिकारी आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचा बनाव करून अमेरिका आणि कॅनडातल्या लोकांना फसवत असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा