खेळ

January 4, 2025 2:49 PM January 4, 2025 2:49 PM

views 7

न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सुरु असलेल्या ए एस बी क्लासिक टेनिस स्पर्धेत पुरुष एकल प्रकारात भारताच्या सुमित नागलनं न्यूझीलंडच्या अलेक्झांडर क्लीचारोवचा १-६, ६-३, ६-१ असा पराभव

न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सुरु असलेल्या ए एस बी क्लासिक टेनिस स्पर्धेत पुरुष एकल प्रकारात भारताच्या सुमित नागलनं न्यूझीलंडच्या अलेक्झांडर क्लीचारोवचा १-६, ६-३, ६-१ असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम पात्रता फेरीत त्याची गाठ फ्रान्सच्या एड्रियन मॅनेरिनो याच्याशी पडणार आहे.

January 4, 2025 1:36 PM January 4, 2025 1:36 PM

views 13

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर ४ धावांची माफक आघाडी, मात्र दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी पुन्हा गडगडली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या, सिडनी इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात, भारतानं दुसऱ्या दिवसअखेर आपल्या दुसऱ्या डावात ६ बाद १४१ धावा केल्या आहेत. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ १८१ धावांत गुं...

January 3, 2025 1:43 PM January 3, 2025 1:43 PM

views 11

बॉर्डर- गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव १८५ धावांमधे आटोपला

बॉर्डर गावस्कर चषक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत सिडनी इथं सुरू असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिल्या डाव १८५ धावांवर आटोपला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंत ने सर्वाधिक ४० धावा केल्या तर रवींद्र जाडेजा ने २६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बोला...

January 3, 2025 9:54 AM January 3, 2025 9:54 AM

views 9

स्वप्नील कुसाळे, सचिन खिलारी यांना अर्जून पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर, मुरलीकांत पेटकर यांचा जीवनगौरव पुरस्कारनं होणार सन्मान

केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. ऑलिंपिकमधे दोन पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश, पॅरा ॲथलिट प्रवीणकुमार आणि हॉकीपटू हरमनप्रित सिंह यांना, यंदाचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा नेमब...

January 2, 2025 7:36 PM January 2, 2025 7:36 PM

views 1

‘हे’ चार खेळाडू यंदाच्या खेलरत्न पुरस्काराचे मानकरी

ऑलिंपिकमधे दोन पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश, पॅरा ॲथलिट प्रवीणकुमार आणि हॉकीपटू हरमनप्रित सिंह यांना यंदाचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार,  तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणा...

January 1, 2025 3:40 PM January 1, 2025 3:40 PM

views 2

ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद : मॅग्नस कार्लसन आणि यान निपोनमीशी यांना संयुक्तरित्या जाहीर

जागतिक ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांचं विजेते पद मॅग्नस कार्लसन आणि यान निपोनमीशी यांना संयुक्तरित्या जाहीर झालं आहे. न्यूयॉर्कमध्ये काल झालेला अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानं दोघांना संयुक्तरित्या विजेतेपदक देण्यात आलं.    महिलांच्या श्रेणीत चीनच्या जू वेनजून हिनं विजेतेपदक पटकावलं...

January 1, 2025 1:49 PM January 1, 2025 1:49 PM

views 6

जागतिक ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आर. वैशाली पराभूत

जागतिक ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांचं विजेते पद मॅग्नस कार्लसन आणि यान निपोनमीशी यांना संयुक्तरित्या जाहीर झालं आहे. न्यूयॉर्कमध्ये काल झालेला अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानं दोघांना संयुक्तरित्या विजेतेपदक देण्यात आलं. महिलांच्या श्रेणीत चीनच्या जू वेनजून हिनं विजेतेपदक पटकावलं. चीनच्य...

January 1, 2025 9:38 AM January 1, 2025 9:38 AM

views 16

संतोष करंडक फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम बंगालला विजेतेपद

हैदराबादमध्ये झालेल्या संतोष करंडक फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पश्चिम बंगालनं काल आपलं 33 वं विजेतेपद पटकावलं. त्यांनी केरळवर 1 – 0 असा विजय मिळवला. बंगालच्या रॉबी हंसडा यानं शेवटच्या काही मिनिटांमध्ये मिळवलेल्या या गोलनं पश्चिम बंगालचा 7 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. हंसडा याच्या 12 गोल्स...

December 31, 2024 8:27 PM December 31, 2024 8:27 PM

views 4

२४व्या वनवासी क्रीडा स्पर्धेचा आज समारोप

छत्तीसगडच्या रायपूर इथं सुरू असलेल्या २४व्या वनवासी क्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. २८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या  क्रीडा स्पर्धेत देशाच्या २९ राज्य तसंच नेपाळमधून एकूण ५७९ आदिवासी खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रामुख्यानं फूटबॉल आणि तीरंदाजीचे सामने झाले. फूटबॉलच्या अंतीम सामन्यात टायब्...

December 31, 2024 8:23 PM December 31, 2024 8:23 PM

views 4

बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबूचा जागतिक ब्लित्झ अजिंक्यपद स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश

बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू हिनं २०२४ महिला जागतिक ब्लित्झ अजिंक्यपद स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. विजयी घोडदौड कायम ठेवत साडेनऊ गुणांसह ती गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. गतविजेती व्हॅलेंटिना गुनिना, पॉलीना शुव्हालोव्हा यांच्यासह अनेक दिग्गज बुद्धिबळपटूंचा तिनं पराभव केला. कोनेरू हं...