January 16, 2025 8:38 PM
27
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही सिंधू, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत दाखल
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अग्रनामांकित पी. व्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिनं जपानच्या मनामी सुझुझचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात सिंधूनं सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. सिंधूचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या ग्र...