खेळ

January 25, 2025 2:55 PM January 25, 2025 2:55 PM

views 8

पुरुषांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत तामिळनाडू ड्रॅगन्स आणि टीम गोनासिका यांच्यात लढत

पुरुषांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत आज तामिळनाडू ड्रॅगन्सचा सामना टीम गोनासिका यांच्यासोबत होणार आहे. तर हैदराबाद तुफान्सची लढत यूपी रुद्रा यांच्यासोबत होणार आहे. सध्या गुणतालिकेत  तामिळनाडू ड्रॅगन्स १७ गुणांसह पहिल्या स्थानावर, तर हैद्राबाद तुफान १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

January 24, 2025 1:19 PM January 24, 2025 1:19 PM

views 16

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून नोवाक जोकोविचने माघार घेतल्याने अलेक्झांडर झ्वेरेव अंतिम फेरीत दाखल

मेलबर्न इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं दुखापतीमुळे अचानक माघार घेतली.    नोवाक जोकोविच आणि जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात  झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिला सेट ७-६ असा गमावल्यावर नोवाक जोकोविचनं स्पर्धेतून मध्येच म...

January 24, 2025 10:37 AM January 24, 2025 10:37 AM

views 17

क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्या वीस षटकांचा सामना

क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या संघांमध्ये उद्या वीस षटकांचा सामना होणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना होईल. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालचा भारताचा संघ पाच सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य असा आघाडीवर आहे.

January 24, 2025 10:31 AM January 24, 2025 10:31 AM

views 1

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेची सहावी फेरी आजपासून नेदरलँड्समध्ये

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेची सहावी फेरी आजपासून नेदरलँड्समध्ये सुरू होणार आहे. या फेरीत भारताच्या अर्जुन एरिगायसीचा सामना फाबियानोशी, डी. गुकेशचा सामना उझबेकीस्तानच्या नॉर्डिरबेक अब्दुलसत्तोरोवशी, तर आर. प्रज्ञानंदचा सामना चीनच्या यी वेईशी होणार आहे.   प्रज्ञानंद सध्या या स्पर्धेत गुणतालिकेत प...

January 24, 2025 10:19 AM January 24, 2025 10:19 AM

views 15

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची अंतिम फेरी आजपासून नवी दिल्लीत

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची अंतिम फेरी आजपासून नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू होणार आहे. उद्यापर्यंत ही स्पर्धा सुरू असणार आहे. शिक्षण विभागानं संरक्षण विभागाच्या सहकार्यानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. तेरा राज्यांमधले सोळा संघ अंतिम फेरीत सहभागी होत आहेत.

January 24, 2025 9:33 AM January 24, 2025 9:33 AM

views 3

खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांना लेह-लडाखमधल्या क्रीडा संकुलात सुरुवात

केंद्रसरकारच्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांना काल लेह -लडाख इथल्या नवांग डोरजी क्रीडा संकुल इथ सुरुवात झाली. 27 जानेवारीपर्यंत होणाऱ्या या क्रीडा स्पर्धांच्या पहिल्या टप्प्यात मुख्यतः बर्फावर खेळल्या जाणाऱ्या आईस हॉकी आणि स्केटिंग याच्या स्पर्धा होणार आहेत.   दुसऱ्या टप्प्यात 22 ते 25 फे...

January 23, 2025 8:46 PM January 23, 2025 8:46 PM

views 2

इंडोनेशिया मास्टर्स सुपर फाईव्ह हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची खराब कामगिरी

जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर फाईव्ह हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंची कामगिरी खराब झाली. मिश्र दुहेरीत भारताच्या तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांचा मलेशियाच्या पँग रॉन हू आणि सू यीन चेंग या जोडीने २१-१८,१५-२१,१९-२१ असा पराभव केला. पुरूष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सा...

January 23, 2025 8:42 PM January 23, 2025 8:42 PM

views 13

U19WC : भारताचा श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय

एकोणीस वर्षांखालच्या महिला क्रिकेट टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत, आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय मिळवला. सुरुवातीला, श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारतानं निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून ११८ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठ...

January 23, 2025 8:39 PM January 23, 2025 8:39 PM

views 5

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोलंडच्या इगा श्वियांतेकचा पराभव

पाचवेळची ग्रँडस्लॅम विजेती, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली पोलंडची इगा श्वियांतेक हिला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिनं अटीतटीच्या सामन्यात तिच्यावर ७-५, ६-१, ७-६ अशी मात केली. आता अंतिम फेरीत मॅडिसनचा सामना शनिवारी अग्रम...

January 23, 2025 8:08 PM January 23, 2025 8:08 PM

views 5

रणजीमध्ये मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भाच्या संघाचे सामने सुरू

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नाशिक इथं सुरु झालेल्या बडोद्याविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्रानं पहिल्या डावात दिवसअखेर ७ गडी गमावून २५८ धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा सौरभ नवले ६०, तर रजनीश गुरबानी २२ धावांवर खेळत होता. सिद्धेश वीरनं ४८, तर यश क्षीरसागरनं ३० धावा केल्या. बडोद्यातर्फे अतित शेठनं ३...