खेळ

January 27, 2025 7:19 PM January 27, 2025 7:19 PM

views 491

जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि स्मृती मानधनाला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं २०२४करता सर्वोत्कृष्ट खेळाडूंची नावं जाहीर केली. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा याला सर्वोत्कृष्ट कसोटीपटू तर महिला क्रिकेटमधे डावखुरी फलंदाज स्मृती मानधना हिला एकदिवसीय सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे.   पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेट...

January 27, 2025 4:02 PM January 27, 2025 4:02 PM

views 19

स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं महिला एकदिवसीय क्रिकेट मधे सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिला जाहीर केला आहे. गेल्या वर्षभरात तिनं १३ एकदिवसीय सामन्यांमधे मिळून ७४७ धावा करुन विक्रमाची नोंद केली. यात ४ शतकी खेळी होत्या. हा देखील महिला क्रिकेटमधला विक्रम आहे. तिच्या...

January 27, 2025 12:41 PM January 27, 2025 12:41 PM

views 6

खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप

खेलो इंडियाच्या हिवाळी स्पर्धांच्या पहिल्या टप्प्याची आज सांगता होत आहे. भारतीय लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या पुरुष संघांमधे आईस हॉकीमध्ये आज अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकं जिंकून, पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे.

January 26, 2025 7:13 PM January 26, 2025 7:13 PM

views 11

रणजी करंडक : महाराष्ट्राचा बडोद्यावर ४३९ धावांनी दणदणीत विजय

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नाशिक इथं झालेल्या सामन्यात आज महाराष्ट्रानं बडोद्यावर ४३९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्रानं पहिल्या डावात, २९७ धावा केल्या होत्या, तर बडोद्यानं १४५ धावा केल्या. दुसऱ्या डावात ७ बाद ४६४ धावांवर महाराष्ट्रानं आज आपला डाव घोषित केला. सौरभ नवलेनं नाबाद १२६ धावा केल्...

January 26, 2025 7:11 PM January 26, 2025 7:11 PM

views 5

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद इटलीच्या यानिक सिनरनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं आहे. त्यानं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्यावर ६-३, ७-६, ६-३ अशी सहज मात केली. २ तास, ४२ मिनिटं चाललेल्या या सामन्यावर सिनरनं सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. त्याला एकाही ब्रेक पॉइंटचा सामना क...

January 26, 2025 8:27 PM January 26, 2025 8:27 PM

views 3

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर ८ गडी राखून मात

आयसीसी १९ वर्षांखालच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर ८ गडी राखून विजय मिळवला.    भारतानं नाणेफेक जिंकून बांग्लादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्यांच्या फलंदाजीला लगाम घातला. बांगलादेशानं नि...

January 26, 2025 2:44 PM January 26, 2025 2:44 PM

views 1

ICC Cricket U-19 : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश सामना

आयसीसी १९ वर्षांखालच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत Ep आज क्वालालंपूर इथं सध्या सुरू असलेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशाच्या ११ षटकांत ५ बाद ३० धावा झाल्या होत्या.    आत्तापर्यंतचे सर्व सामन...

January 26, 2025 1:55 PM January 26, 2025 1:55 PM

views 3

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : पुरुष एकेरीच्या विजेतपदासाठी गतविजेता यानिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांची लढत

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीचा अंतिम सामना अग्रमानांकित आणि गतविजेता यानिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात होणार आहे.  महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात काल अमेरिकेच्या मॅडिनस कीज हिनं अग्रमानांकित अरीना साबालेंका हिला धक्का देत अजिंक्यपद पटकावलं. तिनं साबालेंकावर ६-...

January 25, 2025 8:28 PM January 25, 2025 8:28 PM

views 1

मॅडिसन कीजच्या खात्यात पहिलेच ग्रँडस्लॅम पदक जमा

ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या मॅडिसन कीजने गतविजेत्या बेलारूसच्या अरायना सबालेंकाचा ६-३, २-६, ७-५ असा पराभव करत आपल्या पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. या पराभवामुळे सबालेंकाचं ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या सलग तिसऱ्या ऐतिहासिक वि...

January 25, 2025 3:35 PM January 25, 2025 3:35 PM

views 7

टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत आरिना साबालेंकाचा सामना थोड्याच वेळात होणार

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत  अव्वल मानांकित आरिना साबालेंका हिचा सामना अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिच्याशी थोड्याच वेळात होणार आहे. साबालेंकाने हा सामना जिंकला तर १९९९ नंतर ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा सलग तिनदा जिंकणारी ती पहिला महिला खेळाडू ठरेल. दुसरीकडे मॅडिसन कीजला सात...